• Home
  • Contact Us

Founder & Chairman

 

 
Marathi
 

Chairman

Shree Rohidas Shankar Patil

Founder & Chairman

 

सुमारे पंधरा वर्षापूर्वी श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालयाची स्थापना करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न आज मूर्त रूपात उभे राहताना पाहून स्वप्नपूर्तीचे समाधान जरूर वाटते. परंतु एक स्वप्न पूर्ण होण्या अगोदरच दुसर्‍या स्वप्नाची ओढ लागली आणि तेही जेव्हा पूर्णत्वाकडे जाऊ लागले तेव्हा तिसर्‍या स्वप्नाला साद घातली. त्या स्वप्नाच्या पूर्णतेकडे वाटचाल सुरू झाल्यावर चौथ्या स्वप्नाचे पंख फुटले. याचाच अर्थ माणसाजवळ स्वतःबद्दल विश्‍वास असेल आणि आपल्यासोबतच्या सहकार्‍यांचे मनःपूर्वक पाठवळ असेल तर प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ही उक्ती खरी करता येते.

आज मला, मागे वळून पहाताना त्या संघर्षाची आठवण होते, त्यावेळी जेव्हा जेव्हा आर्थिक गणिते कूट बनली तेव्हा ती सोडवण्यासाठी देणगीदार, समाजातले स्नेही-सोबती, सामान्यातला सामान्य आमच्या पाठी उभा राहिला आणि थेंबे-थेंबे तळे साचे प्रमाणे रूपया-रूपयांचे, लाखो रूपये या समाजकार्यात उभे राहिले हे मी कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच या शिक्षणसंस्थेमध्ये सर्व स्तरातील, प्रातांतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते.

आज भविष्याला सामोरे जाताना या सर्व शिक्षण संस्थांचा कारभार सुरळीत, सुव्यवस्थित चालू रहावा याबरोबर गुणवत्तेला प्राधान्य मिळावे यासाठी परिश्रमांची गरज आहे. हे जाणवते त्यादृष्टीने पुढील शैक्षणिक प्रवासाची आखणी करायला मला आवडेल. त्यासाठीच यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात प्रमिला प्रशासकीय सेवा केंद्र सुरू केले आहे.

शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालय, प्रवीण पाटील तंत्रनिकेतन संस्था, रोहिदास शंकर पाटील पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी देणारी नवी दिल्ली पुरस्कृत शिक्षणसंस्था, या स्वप्नपूर्तीच्या देखण्या इमारती आज भाईंदर शहराची वैभव, परंपरा ठराव्यात अशी माझी मनोमन इच्छा आहे. त्यासाठी तेथे काम करणारा सेवकवर्ग, विद्यार्थ्यांना शिकवणारा प्राध्यापकवर्ग आणि या सर्वांची शान असणारे विद्यापीठ पातळीवर या शिक्षणसंस्थाची नाममुद्रा कोरणारे माझे गुणवंत, कलावंत आणि खेळाडू आसणारे विद्यार्थी यांचे मनापासून सहकार्य अपेक्षिततो. भाईंदर परिसरात घडणार्‍या या शेक्षणिक क्रांती, सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे, घडविण्याचे व टिकवण्याचे आव्हान आम्ही स्वीकारत आहोत हे नम्रपणे सूचित करतो. राष्ट्रीय पूर्नमूल्यांकनासाठी सामोरे जाणार्‍या माझ्या या शिक्षणसंस्थांना मनापासून शुभेच्छा देत सर्व मान्यवरांचे, अनुभव व कार्याने महान असणार्‍या सर्वांचे आशिर्वाद पाठीशी राहोत ही नम्र विनंती !

आपला,

श्री रोहिदास शंकर पाटील

(संस्थापक - अध्यक्ष)

श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट




Founder Trustee

Late Shree Pravin R. Patil

(24.8.1965 to 26.5.1998)
Founder Trustee

 

Our great source of inspiration and aspiration. His vital contribution and selfless service were involved in the establishment and development of the Shankar Narayan Education Trust.